#WillAndChris : Oscar सोहळ्यात घडला धक्कादायक प्रकार, अँकरच्या कानशिलात लगावली

Update: 2022-03-28 08:44 GMT

संपूर्ण जगात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा सोमवारी दिमाखात पार पडला. मात्र या सोहळ्याला एका धक्कादायक घटनेने गालबोट लागले. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथने याने पुरस्कार सोहळ्याचे अँकरिंग करणाऱ्या ख्रिस रॉक याला भर स्टेजवर कानाखाली मारली. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

नेमके घडले काय?

ख्रिस रॉक हा अभिनेता बेस्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार जाहीर करण्यासाठी स्टेजवर आला होता. पण स्टेजवर येता त्याने हास्यविनोद सुरू केले. यामध्ये ख्रिस रॉक ह्याने अभिनेता विल स्मिथची पत्नी जॅडा हिची खिल्ली उडवली, त्यामुळे संतापलेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन रॉकच्या कानाखाली लगावली.

अभिनेता विल स्मिथच्या पत्नी जेडा पिंकेट स्मिथ ही देखील या सोहळ्याच्या वेळी विलसोबत तिथे उपस्थित होती. यावेळी विनोदी अभिनेता ख्रिस रॉक हा स्टेजवर आला. पण येताच त्याने जेडाबाबत टिप्पणी केली. G.I. Jane २ मध्ये तिला पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे त्याने म्हटले. पण यामुळे संतापलेला विल स्मिथ स्टेजवर पोहोचला आणि त्याने ख्रिस रॉकच्या कानाखाली मारली. यानंतर विल स्मिथ शांतपणे स्टेजखाली गेला. आणि आपल्या खुर्चीवर बसून त्याने क्रिसला आपल्या पत्नीचे नाव न घेण्याचा इशारा ओरडून दिला.

विल स्मिथच्या पत्नीला कोणता आजार आहे?

जेडा पिंकेड हिला अलोपेसिया हा आजार झाला आहे. या आजारामुळे तिचे डोक्यावरचे केस गळत आहेत. जेडाने पहिल्यांदाच २०१८ मध्ये यावर जाहीरपणे भाष्य केले होते. अंघोळ करताना केस हातात येत असल्याने आपण केस कापण्याचा निर्णय़ घेतल्याचे तिने सांगितले होते. याचा संदर्भ असल्याने ख्रिस रॉक याने जेडाने नाव घेत G.I. Jane २ या सिनेमाचा उल्लेख केला होता. या सिनेमामध्ये डेमी मूर या कलाकाराने उभे केलेले जॉर्डन नावाने पात्र टक्कल असलेले होते. क्रिसने जेडाच्या आजारपणाची खिल्ली उडवत G.I. Jane २ मध्ये तिला पाहायचे आहे, असे वक्तव्य केले होते. काही क्षणात घडलेल्या या घटनेने प्रेक्षकांना काहीच कळले नाही. पण नंतर विल स्मिथ रडताना दिसला. त्यामुळे हा प्रकार स्क्रिप्टेड नसून अचानक घडल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले.

Tags:    

Similar News