शेतात स्वतः ची चिता रचून वृद्ध पती-पत्नीची आत्महत्या?

Update: 2020-06-13 03:17 GMT

बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव शहरात जयपुर लांडे शिवारातील शेतातील गवताच्या गंजीला आग लावून घेत एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या दोघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत. श्रीकृष्ण लांडे वय 75 आणि सईबाई लांडे वय 70 या दोघांनी कापसाच्या पराटीच्या गंजीला आग लाऊन यामधे आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या मुलाने केली आहे.

श्रीकृष्ण लांडे व सईबाई लांडे हे रोजच्या प्रमाणे सकाळी शेतामधे काम करण्यासाठी गेले होते, रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा पुतण्या आणि मुलगा भानुदास लांडे यांनी शेतात शोध घेतला. शेतातील कापसाच्या पराटीच्या गंजीमधे दोघेही जळलेल्या अवस्थेत आढळले.

हे दोघेही 20 वर्षापासून आपल्या मुलांपासुन वेगळे राहत होते. त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा..

कोरोनाचे संकट आणि शेतकरी

#Lockdowneffect- बांबू उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक अडचणीत

LockDown: मध्ये शेतकरी ते ग्राहक थेट, विक्रीचा किफायतशीर ‘औरंगाबाद पॅटर्न’

अँब्युलन्स चालकाचा आगळा वेगळा वाढदिवस

बापरे बाप!

जातीव्यवस्था : मजबूत होतीय की खिळखिळी? प्रा. हरी नरके

Similar News