जयंत पाटील कोरोना पॉझिटीव्ह

राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील हे कोरोना प्रभावित झाले आहेत. जयंत पाटील यांनी आज सकाळीच ट्विट करत आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनाही करोना चाचणी करण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असून सध्या घरातूनच आपल्या सेवेत राहील असं सांगितलं आहे.

Update: 2021-02-18 04:26 GMT

जयंत पाटील यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो".

देशात सर्वोधिक कोरोना मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग आता पुन्हा वाढला आहे.नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरू आहे. काल २४ तासांमध्ये राज्यभरात ४ हजार ७८७ नवे करोनाबाधित रुग्ण वाढले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ८५३ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३८ हजार १३ असून, आजपर्यंत करोनामुळे ५१ हजार ६३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Tags:    

Similar News