बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेला प्रारंभ...

Update: 2023-02-07 07:31 GMT

मुंबई पोर्ट ट्रस्टने नवी मुंबईतील नवीन वॉटर टॅक्सी सेवेला मंजुरी दिल्यानंतर, राज्याचे जहाज वाहतूक मंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते आज सकाळी बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीच्या पहिल्या फेरीचे उद्धाटन करण्यात आले. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडची 'नयन इलेव्हन' ही वातानुकूलित वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण मुंबई ते नवीमुंबईला थेट जोडणार आहे.

दक्षिण मुंबई ते नवीमुंबईला थेट जोडण्यासाठी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडद्वारा संचालित 'नयन इलेव्हन' हे जहाज या मार्गावरील एकमेव सेवा असणार आहे. ही वातानुकूलित वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण मुंबईला - नवीमुंबईला जोडणार आहे. आता बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीमुळे प्रवाशांचा वेळ ही वाचणार आहे आणि प्रवाशांच्या पैशांची देखील बचत होणार आहे.

गेटवे ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. या टॅक्सीचे तिकीट दर प्रत्येकी ३०० रुपये असणार आहेत. 'नयन इलेव्हन' बोटीमध्ये एकूण २०० प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असून वर आणि खाली अशा दोन्ही ठिकाणी प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच नोकरदार वर्गांना पासची सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता या वॉटर टॅक्सीला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News