केंद्राकडून मुंबई पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप, 10 पोलिसांना राष्ट्रीय पुरस्कार

Update: 2020-08-15 04:37 GMT

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ , १४ पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

हे ही वाचा...

#IndependenceDay : शास्त्रज्ञांनी हिरवा झेंडा दाखवल्याशिवाय कोरोनावरील लस नाही : पंतप्रधान

भारत प्रत्युत्तर देण्यास सक्षम, राष्ट्रपतींचा चीनला इशारा

भारत प्रत्युत्तर देण्यास सक्षम, राष्ट्रपतींचा चीनला इशारा

चरखेसे आझादी मिली क्या?

स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी एकूण 926 पोलीस पदक जाहीर झाली असून महाराष्ट्राला एकूण 58 पदकं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणावरुन मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असतानाच मुंबईतील 10 पोलिसांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन केंद्राने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले मुबंईतील पोलीस अधिकारी

1. संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, शहिद भगतसिंग रोड, कुलाबा, मुंबई.

2. विनायक बद्रीनारायण देशमुख, सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महासंचालक पोलीस कार्यालय, कोलाबा मुंबई

3. तुषार चंद्रकांत दोशी, मुख्याध्यापक / पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अंधेरी पूर्व, मुंबई

4. केदारी कृष्ण पवार, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर

5. सूर्यकांत गणपत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी.बी. मार्गे पोलिस स्टेशन, मुंबई

6. विनय बाबूराव घोरपडे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर

7. शालिनी संजय शर्मा ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नागपाडा पोलीस स्टेशन, मुंबई

8. विलास विठ्ठल पेंडुरकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई

9. विजय वासुदेव खर्चे, सहायक उपनिरीक्षक, शहर कोतवाली पोलिस स्टेशन, मुंबई

10. विश्वास दिनकरराव भोसले, सहाय्यक उपनिरीक्षक, चेंबूर पोलीस ठाणे, मुंबई

Similar News