सदोष बियाणे बनविणाऱ्या कंपनींवर कडक कारवाई करा: नाना पटोले

Update: 2020-06-24 02:10 GMT

सदोष खते, बियाणे, कीटकनाशक बविणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली.

येथील कृषी भवन येथे पटोले यांनी तोमर यांची भेट घेऊन शेतकऱ्यांसमोर असलेल्या या गंभीर समस्येवर सविस्तरपणे चर्चा केली. शेतकरी वर्षभर मेहनत करून शेतात पीक घेत असतात त्यात त्यांना खत कंपन्या, बियाणे कंपन्या, कीटकनाशक औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या सदोष मालाची निर्मिती करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असतात. त्यामुळे शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत येतात.

हे ही वाचा..

कोरोनाचे संकट आणि शेतकरी

शेतकरी दुहेरी संकटात ; टोमॅटोवर नव्या व्हायरसचा संसर्ग

#Lockdowneffect- बांबू उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक अडचणीत

अश्या बनावटी खत, बियाणे, कीटकनाशक निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) या सारख्या कायद्याचा वापर करून कडक कारवाई करावी. अशी मागणी बैठकीत पटोले यांनी केली.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कारवाईचे अधिकार केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने केंद्र शासनाने यावर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक शक्य तितक्या लवकर रोखावी, अशी विनंती पटोले यांनी केली. केंद्रीय मंत्री तोमर यांनी योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे पटोले यांनी बैठकी नंतर सांगितले.

Similar News