तुकाराम मुंढेवर 20 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, महापौर संदीप जोशी यांची पोलिसात तक्रार

Update: 2020-06-22 15:12 GMT

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर 20 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप नागपूर महापालिकेचे महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी ‘स्मार्ट सिटी’मध्ये 20 कोटींचा घोटाळा केला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

“तुकाराम मुंढे यांनी इतर दोन अधिकाऱ्यांसोबत मिळून पदाचा गैरवापर केला. त्यांनी जबरदस्तीने 20 कोटी रुपये ट्रान्सफर केले”, असा गंभीर आरोप जोशी यांनी केला आहे.

तुकाराम मुंडे यांनी महापौर संदीप जोशी यांच्यातील वाद आता पोलिसात गेला आहे.

तुकाराम मुंडे यांनी नगरसेवकांनी सभागृहात वापरलेल्या अपमानास्पद शब्दांमुळे सभात्याग केला होता.

नक्की काय आहे प्रकरण?

नागपूरमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली. पण त्यानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधातील काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी मुंढे यांनाच लक्ष्य केल्यानंतर म मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत व्यक्त केलं.

तुकाराम मुंढे आणि राजकारण्यांचे नेहमी खटके उडताना पाहायला मिळतात. सध्या तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आयुक्त आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आमसभा सुरु असताना मोठा गोंधळ झाला. सभेच्या सुरुवातीलाच भाजप व कॉंग्रेस नगरसेवक मुंढेंविरोधात आक्रमक झाले.

भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर मोठी टीका केली. त्यानंतर बोलायला उभा राहिलेल्या कॉंग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी मुंढे यांच्याबाबत वैयक्तिक टीका केली. हरीश यांनी ‘तुकारामाच्या नावावर कलंक’ असल्याचे अपशब्द वापरले.

हे ही वाचा

VIDEO: माझी व्यक्तिगत प्रतिमाहनन केलं जात आहे: तुकाराम मुंडे

…तर कोरोनाचा उद्रेक अटळ – तुकाराम मुंढे

त्यानंतर मुंढे यांनी नगरसेवकांनी वापरलेल्या शब्दांवर आक्षेप घेत तात्काळ जागेवरुन उठले.

‘जर नगरसेवक आवाज चढवून बोलणार असतील तर मी इथे बसणार नाही’

असं म्हणत सभात्याग केला.

या संदर्भात मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी होणार असेल तर आपण सहन करणार नाही. शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुंढे यांच्यावर नगरसेवकांनी वैयक्तिक टीका केली. त्यामुळं मी सभात्याग करून बाहेर पडलो.

महापौर आणि नगरसेवकांकडून हे जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं. ज्या केटी नगर येथील रुग्णालय उभारताना आरक्षण बदलण्यात आलं, असा आरोप करण्यात आला. हा आरोप चुकीचा आहे. मुळात आरक्षण बदललं नाही, नियमात काम झालंय, त्यामुळं आरोप चुकीचे आहेत.

Full View

'तुम्ही तुकाराम यांच्या नावावर कलंक आहात' ही वैयक्तिक टीका झाल्यानं मी सभात्याग केला, निघून गेलो नाही. महापौरांनी सदस्यांना वैयक्तिक टीका करू नका. अशी समज देणं अपेक्षित होतं, ते त्यांनी केलं नाही. त्यामुळं हे होणार असेल तर आपण सहन करणार नाही. असं मुंढे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुंढे यांच्या पत्रकार परिषदेनंतर महापौर संदीप जोशी...

जे मुंढे आपल्या अधिकाऱ्यांना बोलावून महापौरांना माहिती देऊ नका, नाहीतर माझं नाव तुकाराम मुंढे आहे, असा दम देतात. ते मुंढे मुस्कटदाबी होते असं म्हणत असतील तर ही शोकांतिका आहे. आरक्षण न काढता रुग्णालय तयार केलं या प्रश्नावर आपण अडचणीत येतोय हे लक्षात आल्यावर मुंढे यांनी सभागृह सोडणं आणि सभागृह सभात्याग करणे यात काय फरक आहे, असा प्रश्नही जोशी यांनी केला. नगरसेवकांचे फोन उचलले नाही, तेव्हा मुंढे साहेब दुटप्पीपणा नव्हता का? असं असली तरी जनतेच्या प्रश्नावर मुंढे यांनी उद्याच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित राहावं. मुंढे जर जाहीर चर्चा करायला तयार असतील तर आज सायंकाळी 6 वाजता ते म्हणतील त्या ठिकाणी आपण यायला तयार आहोत, असं आवाहनही महापौर यांनी मुंढे यांना केलं आहे.

त्यानंतर महापौर जोशी यांनी मुंढे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत त्यांच्यावर 20 कोटींचा आरोप केला आहे.

Similar News