Home > News Update > VIDEO: माझी व्यक्तिगत प्रतिमाहनन केलं जात आहे: तुकाराम मुंडे

VIDEO: माझी व्यक्तिगत प्रतिमाहनन केलं जात आहे: तुकाराम मुंडे

VIDEO: माझी व्यक्तिगत प्रतिमाहनन केलं जात आहे: तुकाराम मुंडे
X

नागपूरमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली. पण त्यानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधातील काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी मुंढे यांनाच लक्ष्य केल्यानंतर आज तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत व्यक्त केलं.

तुकाराम मुंढे आणि राजकारण्यांचे नेहमी खटके उडताना पाहायला मिळतात. सध्या तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आयुक्त आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आमसभा सुरु असताना मोठा गोंधळ झाला. सभेच्या सुरुवातीलाच भाजप व कॉंग्रेस नगरसेवक मुंढेंविरोधात आक्रमक झाले.

भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर मोठी टीका केली. त्यानंतर बोलायला उभा राहिलेल्या कॉंग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी मुंढे यांच्याबाबत वैयक्तिक टीका केली. हरीश यांनी ‘तुकारामाच्या नावावर कलंक’ असल्याचे अपशब्द वापरले.

त्यानंतर मुंढे यांनी नगरसेवकांनी वापरलेल्या शब्दांवर आक्षेप घेत तात्काळ जागेवरुन उठले.

‘जर नगरसेवक आवाज चढवून बोलणार असतील तर मी इथे बसणार नाही’

असं म्हणत सभात्याग केला.

त्या दिवशी सभागृहात नक्की काय घडलं होतं. या संदर्भात मुंढे नक्की काय म्हणाले?

अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी होणार असेल तर आपण सहन करणार नाही. शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुंढे यांच्यावर नगरसेवकांनी वैयक्तिक टीका केली. त्यामुळं मी सभात्याग करून बाहेर पडलो.

महापौर आणि नगरसेवकांकडून हे जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं. ज्या केटी नगर येथील रुग्णालय उभारताना आरक्षण बदलण्यात आलं, असा आरोप करण्यात आला. हा आरोप चुकीचा आहे. मुळात आरक्षण बदललं नाही, नियमात काम झालंय, त्यामुळं आरोप चुकीचे आहेत.

'तुम्ही तुकाराम यांच्या नावावर कलंक आहात' ही वैयक्तिक टीका झाल्यानं मी सभात्याग केला, निघून गेलो नाही. महापौरांनी सदस्यांना वैयक्तिक टीका करू नका. अशी समज देणं अपेक्षित होतं, ते त्यांनी केलं नाही. त्यामुळं हे होणार असेल तर आपण सहन करणार नाही. असं मुंढे यांनी म्हटलं आहे.

Updated : 22 Jun 2020 2:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top