Mumbai Municipal Corporation : गंभीर दखल घ्या, मतदानासाठी नाही मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांची रांग!
Municipal Corporation आज राज्यात महापालिकांसाठी मतदान होत आहे. परंतु मतदारांना Vote लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. योग्य पद्धतीने नियोजन न केल्यामुळे मतदारांना गोंधळ आणि असुविधेला सामोरं जावं लागत आहे. याची मुंबई मनपा गंभीर दखल घ्या असं अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी गेलेले ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितलं आहे.
मुंबई मनपा । गंभीर दखल घ्या
। मी अंधेरी पश्चिम आझादनगर क्र २ मतदान केंद्रावर आहे, मतदारांना त्यांची नावं, केंद्र सापडत नाही. Andheri West Azad Nagar No. 2
। निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत डाऊन (Election Commission website)
। मतदारांना कुठे मतदान करायचं ते कळत नाही
। मी स्वत: काल रात्रीपासून मतदान केंद्र शोधलं, सापडलं नाही.
। आझादनगरमधील दुसऱ्या मतदान केंद्रावर आलो, तिथं आता रांगेत, अनेक मतदान बूथसाठी एकच तपासणी व्यवस्था
। तिथंही सापडलं नाही, अखेर स्थानिक टेबलवरील सचिन नायक आणि शिवसैनिकांनी फोनाफोनी केली, माझं, पत्नीचं नाव दुसऱ्याच वॉर्डात गेल्याचं शोधून दिलं.
। मी तिथं जाऊन आता मतदान केलं
। मतदान वेळही यावेळी एक तासाने कमी केली आहे
। मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये पदाधिकारी मतदारांवर प्रभाव पाडतील म्हणून बंद करण्यात आलेली ७०८ मतदानकेंद्र पुन्हा सुरु करण्यात आली, तिथं सोय पाहता, इतरांचं काय?
। मतदान वाढवण्यासाठी तिथं मतदान केंद्रं, मग मतदानाची माहिती का नाही? मतदानाची वेळ का कमी केली?
सोबतचं छायाचित्र मतदानासाठीच्या नाही केंद्र शोधण्यासाठीच्या रांगेचा!