एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

Update: 2021-11-12 10:53 GMT

गेली आठवडाभर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असतानाअजूनही तोडगा निघालेला नाही, महामंडळाची आर्थिक परीस्थिती पाहता प्रवाशांचे हाल होत असून संप माघारी घेण्याचे कळकळीचे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आलं आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी निवेदन प्रसिद्ध केले आहे, महामंडळाची परिस्थिती खालावली आहे, सहकार्य करण्याचे केले आवाहन केले आहे.

आता राज्यातील २५० डेपोंमधील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा बंद असल्याने राज्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा फटका बसला आहे. आज एसटी महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध करत संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केलं आहे.

एसटी महामंडळाचा संचित तोटा हा १२ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे. संपामुळे दररोज १५ ते २० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. याचा परिणाम महामंडळाला आणि परिणामी एसटी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागणार असल्याचं निवेदनात सांगितलं आहे. सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याने संप मागे घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.

एकीकडे निवेदन जरी एसटी महामंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलं असलं तरी आत्तापर्यंत आंदोलन करणाऱ्या २ हजारच्यावर एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करत कठोर करावाई देखील महामंडळाने केली आहे. तर दुसरीकरडे चर्चेची दारं खुली आहेत असं परिवहन मंत्री अनिल परब सांगत आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही संपाला मनाई केली आहे. असं असलं तरी एसटी महामंडळाचे हे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी आग्रही आहेत.

Tags:    

Similar News