हरिश्चंद्र गड चढत किसान सभेचा मोर्चा; वन विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Update: 2021-09-13 12:16 GMT

वन विभागाने शेतात लावलेली झाडे उपटून टाकत अभयारण्यात आंदोलकांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. आदिवासी शेतकरी वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी हिसकावून घेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हरिश्चंद्र अभयारण्य परिसरात वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये रानटी झाडे लावण्याचे प्रकार सुरू केले असल्याचा आरोप करत किसान सभेने हे आंदोलन केले.

भर पावसात वाजत गाजत काढण्यात आलेल्या या मोर्चात अभयारण्य परिसरातील 23 गावचे शेतकरी सहभागी झाले. पारंपरिक वाद्य व क्रांतिकारक घोषणा देत हरिश्चंद्रगड निम्मा चढत मोर्चा अभयारण्यातील शेतात नेण्यात आला. शेकडो शेतकरी मोर्चाने डोंगर चढत शेतात पोहचले.शेतकऱ्यांच्या शेतात लावलेली झाडे उपटत यावेळी वन विभागाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी आंदोलकांनी आदिवासींची उभी पिके उध्वस्त करण्याच्या प्रयत्न केलेे जात असल्याचे म्हटले आहे.वन विभागाच्या या अन्यायाविरोधात किसान सभा मैदानात उतरली आहे. किसान सभेच्या पुढाकाराने परिसरातील हजारो गरीब शेतकऱ्यांची वन प्रकरणे पात्र करण्यासाठी अपील दाखल करण्यात आली आहे,असे असताना कोणत्याही आदेशाची किंवा अंतिम निकालाची वाट न पाहता वन विभाग आदिवासींच्या शेतात अशा प्रकारे घुसणार असेल तर आदिवासींना किसान सभेच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात घुसावे लागेल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

Tags:    

Similar News