देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यात सत्तेचा मगरूरपणा घुसला - आमदार प्रणिती शिंदे

Update: 2021-10-24 12:38 GMT

"देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यात सत्तेचा मगरूरपणा घुसल्यामुळे ते शेतकऱ्यांवार गाड्या चालवून चिरडतायत,लोकांना अटक करतायत" अशी टीका काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात केली आहे.

पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की,"सत्ता मिळाली की आपुलकी आणि जाणीव वाढायला पाहिजे, अधिक सहानुभुती, संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे.मात्र, भाजपावाल्यांची उलट आहे. ते मगरूर होतात, लोकांचा अंत बघतात, सत्तेचा कितीही वापर केला तर आम्हाला कोणी हात लावू शकतं नाही अशा अविर्भावात भाजपवाले आहेत. आज शेतकऱ्यांवर बुलडोजर फिरवतात आणि दुसऱ्या दिवशी उदघाटनाला जातात, त्यामुळे यांना कांही लाज, लज्जा, शरम राहिलंच नाही.त्यामुळं जे वरचे लोक करतात तेच खाली होतं, आता सोलापुरात 'तेलगु भवन'च काम एवढं सुरेख सुरू आहे तर लगेच कोर्टात जातात.

चांगलं काम करायला जाताना नेहमी यांची मांजर आडवी येतेच. त्यामुळे आत्ता लोकांना कळून चुकलंय की,

जेंव्हा हाताची सत्ता होती तेंव्हा गॅस सिलेंडर,घरगुती तेल,पेट्रोल, डिझेल परवडायचे. आता दुष्काळात तेरावा महिना झाला आहे ,एक तर लॉकडाऊनची सावली आणि त्यात भाजपचा मगरुरपणा त्यामुळे लोकांनी कसं जगावं हा प्रश्न निर्माण झाला आहे." असे आ. प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. सोलापुरात नगरासेवकांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

Tags:    

Similar News