ओझरखेडा तलावमध्ये पाणी सोडण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटलांचे जलसमाधी आंदोलन

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील तलावांमध्ये शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यासाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन केले.

Update: 2021-08-17 08:30 GMT

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील तलावांमध्ये शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यासाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन केले.

हातनुर धरणातून शेतीसाठी ओझरखेडा तलावमध्ये दरवर्षी पाणी सोडण्यात येते. मात्र, यावर्षी ओझरखेडा तलावांमध्ये पाणी सोडण्यात आलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके करपू लागली आहेत. ओझरखेडा तलावात तातडीने पाणी सोडण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत होती. मात्र, वारंवार मागणी करून देखील संबधित प्रशासनाने तलावात पाणी सोडले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.

ओझरखेडा तलावात तातडीने पाणी सोडावे या मागणीसाठी आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेकडो शेतकरी व शिवसैनिकांसह ओझरखेडा तलावांमध्ये जलसमाधी आंदोलन केले. यावेळी त्यांनी तलावातील पाण्यामध्ये उतरून शेतकरी, शिवसैनिक आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Tags:    

Similar News