'ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही', भुजबळांच्या वक्तव्यावर जरांगेंच प्रत्युत्तर…

Update: 2024-01-07 04:53 GMT

पंढरपूर येथे obc येल्गार मेळावा पार पडला. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते, मंत्री छगन भूजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही, म्हणजे नाही, असं व्यक्तव्य केलं आहे. भुजबळांच्या या वक्तव्यांवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार असल्याचं वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे.

छगन भुजबळ यांच वक्तव्य

“मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण, मराठा समाजानं स्वतंत्र १०, १२ किंवा १५ टक्के आरक्षण घ्यावं. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मात्र, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, म्हणजे नाहीठ. असं वक्तव्य भूजबळांनी केलं ते पुढे म्हणाले की "समोरच्या लोकांच्या मागण्या वाढत आहेत. त्यांची लेकरे बाळं गरीब असल्यानं आरक्षण पाहिजे. २०० जेसीबी आणि हेलिकॉप्टरमधून फुलांची उधळण करण्यात येते, तरीही ते गरीब आहेत,” अशी टीका भुजबळांनी केली होती

मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर

आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण सुरू आहे. यामुळे दोन्ही समाजाचे नेते एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी छगन भूजबळ यांच्या वक्तव्यावर दिलं आहे."मराठे कर्ज काढतात, कष्ट करतात आणि वाहने घेतात. आमच्या घामाचे पैसे आणि घामाच्या गाड्या आहेत. लोकांचे पैसे लुबाडून छगन भुजबळ जेलमध्ये गेले होते. त्यांनी भानात राहू बोलावं.” असंही जरांगे पाटील म्हणाले आहे 

Tags:    

Similar News