कोरोनाग्रस्त अमेरिकेत आणखी एक संकट, अनेक ठिकाणी हिंसाचार

Update: 2020-06-01 01:54 GMT

जगातील सर्वात जास्त कोरोनाबाधीत रुग्ण असलेल्या अमेरिकत परिस्थिती नियंत्रणात आणून जनजीवन सुरळीत करण्यासाठी ट्रम्प सरकार प्रयत्न करत असताना अमेरिकेत एक धक्कादायक घटना घड ली आहे. जॉर्ज फ्लॉइड या एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मिनियापोलीस शहरात पोलिसांच्या हाणामारीत मृत्यू झाला आहे.

२५ मे रोजी ही घटना घडली. तेव्हापासून अमेरिकेमधील विविध शहरांमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे १५ शहरांमध्ये सुमारे ५ हजार नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये तप कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

हे ही वाचा...

'Mission Begin Again' तीन टप्प्यात, 3, 5 आणि 8 जून ला काय सुरु होणार?

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले ३४२ कोटी, कोरोनावर खर्च फक्त 23 कोटींचा

3 जून पासून राज्य Unlock Mode वर, कोणत्या बाबींमध्ये सुट मिळणार?

त्याचबरोबर ४० शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. एवढेच नाहीतर काही आंदोलकांनी तर जॉर्जला न्याय मिळावा यासाठी व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ज्या पोलिसाने जॉर्जची मान आपल्या पायाने दाबून ठेवल्याने त्याचा मृत्यू झाला, त्याला अटक करण्यात आली आहे.

Similar News