Home > News Update > मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले ३४२ कोटी, कोरोनावर खर्च फक्त 23 कोटींचा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले ३४२ कोटी, कोरोनावर खर्च फक्त 23 कोटींचा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले ३४२ कोटी, कोरोनावर खर्च फक्त 23 कोटींचा
X

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात देणगीदारांच्या मदतीने 342 कोटी रुपये जमा करण्यात आले असताना प्रत्यक्षात कोविडच्या नावावर केवळ 23.82 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने दिली आहे. आश्चर्य म्हणजे परप्रांतीय कामगारांच्या प्रवासासाठी सर्वाधिक 55.20 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत आणि 80 लाख रुपये औरंगाबाद रेल्वेतील अपघातग्रस्तांना देण्यात आले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि वाटप केलेल्या रकमेचा तपशील मागविला होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सहाय्यक लेखापाल मिलिंद काबाडी यांनी अनिल गलगली यांना एकूण जमा रक्कम व वाटपाची माहिती दिली. 18 मे 2020 पर्यंत एकूण 342.01 कोटी रुपये जमा झाले आहेत. या रक्कमेमधून एकूण 79,82,37,070/- रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. खर्च झालेल्या रक्कमेपैकी केवळ 23,82,50,000 / – रुपये कोविड 19 वर खर्च झाले आहेत. त्यापैकी 20 कोटी रुपये सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबईला देण्यात आले असून 3,82,50,000/ – रुपये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला देण्यात आले आहेत.

हे ही वाचा...


3 जून पासून राज्य Unlock Mode वर, कोणत्या बाबींमध्ये सुट मिळणार?

मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीची दखल, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढणार, ट्रम्प यांचे संकेत

प्रवासी मजुरांना देण्यात आलेली रक्कम राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे जेणेकरून रेल्वेचे भाडे वेळेवर देता येईल. यामध्ये 36 जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांचे रेल्वेचे भाडे, 53,45,47,070/ – इतके आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मजुरांसाठी रेल्वेचे भाडे 1.30 कोटी रुपये तर सांगली जिल्ह्यातील मजुरांसाठी रेल्वे भाडे 44.40 लाख रुपये आहे. औरंगाबाद येथील रेल्वे अपघातातील मजुराला प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे मृत व्यक्तीला 80 लाख रुपयांची आर्थिक मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या खात्यातून देण्यात आली आहे.

अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाने कोविड-19 साठी जमा केलेल्या एकूण रक्कमेपैकी केवळ 7 टक्के रक्कम ही आरोग्य सेवांवर खर्च केलेली आहे. प्रवासी कामगारांच्या रेल्वे तिकिटावर 16 टक्के आणि रेल्वे अपघातग्रस्तांवर 0.23 टक्के रक्कम खर्च केली आहे.

आजही मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये 262.28 कोटी रुपये शिल्लक आहेत. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, पालिका आणि शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांच्या पूर्ततेसाठी जर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये जमा झालेली रक्कम खर्च केली गेली तर त्यांचा निधी योग्य कामात वापरल्याचा निश्चितपणे देणगीदारांना दिलासा मिळेल.

Updated : 31 May 2020 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top