अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत सरकारचा निर्णय

Update: 2020-06-11 02:25 GMT

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पिंपळधरा इथल्या अरविंद बनसोड (Arvind Bansode) या तरूणाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे दिला असल्याचे असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा...


राज्यातील मंत्री आणि मुख्य सचिवांचा संघर्ष शिगेला, मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी

मुख्य सचिव अजॉय मेहतांवर अशोक चव्हाण यांची नाराजी

राज्यातील हा जिल्हा कोरोनामुक्त !

काय आहे अरविंद बनसोड मृत्यू प्रकरण?

पिंपरी चिंचवडमधील सांगवीमध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी एका मागासवर्गीय मुलाला मारहाण झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी पकडले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे.

राज्यात कोणत्याही मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत, तसंच अशाप्रकारच्या गुन्ह्यातील दोषींविरुद्ध तात्काळ कडक कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

Similar News