Home > News Update > काय आहे अरविंद बनसोड मृत्यू प्रकरण?

काय आहे अरविंद बनसोड मृत्यू प्रकरण?

काय आहे अरविंद बनसोड मृत्यू प्रकरण?
X

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पिपळधरा गावातील अरविंद बनसोड या ३० वर्षीय तरुणाचा २७ मे २०२० रोजी संशयास्पद मृत्यू झालेला आहे. यासंबंधातील घटनाक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक २७ मे २०२० ला अरविंद बनसोड त्याचा एक मित्र गजानन राऊत यांच्यासह एटीएमच्या जवळ असणाऱ्या एका एचपी गॅस एजन्सी जवळ गेले. ही एजन्सी त्याच गावातील पंचायत समिती सदस्य मिथिलेश उमरकर यांची आहे. अरविंद बनसोड यांनी या एचपी गॅस एजेंसीच्या बोर्डचे काही फोटो आपल्या मोबाईलवरून घेतले. यामुळे मिथिलेश उमरकरला राग आला. त्याने या कारणावरून अरविंद व त्यांचा मित्र गजानन राऊत यांच्याशी वादावादी केली. आणि घटनास्थळावरुन निघून गेले.

विशेष बाब म्हणजे एचपी गॅस एजन्सीचे मालक उमरकर हे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जवळचे कार्यकर्ते आहे.

त्यानंतर काही वेळाने अरविंद गॅस एजेंसीच्या समोर जमिनीवर पडलेला होता. त्याच्या जवळच एक कीटकनाशकाची बाटली होती. त्याच्या भोवती गावातील लोक जमा झाले होते. तसेच ज्यांच्या सोबत वाद झाला होता. तो पंचायत समिती सदस्य मिथिलेश उमरकर व त्याचे सोबती तेथे हजर होते. त्यांनी अरविंदला स्वत:च्या कार मध्ये उचलून बसवले व बाजूला पडलेली किटकनाशकाची बॉटल सोबत घेतली.

हे ही वाचा...


#missionbeginagain : मुंबईची दुसरी लाईफलाईन आजपासून

राऊतांचा 'रोखठोक' घाव, सोनू सूदची मातोश्रीवर धाव !

कोरोना रुग्णांचे हाल, खासगी हॉस्पिटल्स मालामाल

#missionbeginagain :10 टक्के उपस्थितीसह आजपासून खासगी कार्यालये सुरू

मिथिलेश उमरकरने अरविंदला हॉस्पिटल मध्ये एडमिट केले. अरविंद यांचा त्यानंतर दोन दिवसांनी दिनांक २९ मे रोजी दवाखान्यात मृत्यू पावला.

या घटनाक्रमात मृत अरविंदच्या सोबत असलेला गजानन राऊत याने अरविंदच्या कुटुंबातील लोकांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी लगेच तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट तक्रारकर्त्यानाच धमकावले. अरविंदच्या मृत्यूनंतर २९ मे ला दुपारनंतर ४.३० वाज़ता पोलिसांनी मिथिलेश उमरकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध, भादंविसंच्या कलम ३०६ ( आत्महत्येस प्रवृत्त करणे) व ३४ ( संगनमताने गुन्ह्याचा कट रचणे ) या कलमाखाली गुन्हा नोंदविला. संशयित आरोपींना लगेच दुसऱ्या दिवशी ३० मे ला अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला.

Updated : 8 Jun 2020 7:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top