नवीन कोरोना संकट : महाराष्ट्रात निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत कायम

नवीन कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार एक मोठा निर्णय घेतला आहे.

Update: 2020-12-30 14:15 GMT

राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना नवीन कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने राज्य सरकारने ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातले परिपत्रक राज्य सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले निर्बंध मिशन बिगीन अगेन अंतर्गत शिथिल करण्यात आले आहेत.

पण अजूनही काही निर्बंध कायम आहेत, यामध्ये मुंबईतील लोकल सेवेचा देखील समावेश आहे. पण राज्य सरकारने कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू असलेले निर्बंध 31 जानेवारी पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतात नवीन कोरोनाचे 20 रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. याआधी घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करत सरकारने अनेक उपक्रमांना परवानगी दिलेली आहे.

पण अजूनही मुंबई लोकलसह काही उपक्रम हे बंद आहेत. आता या नवीन निर्बंधांमुळे मुंबई लोकल येत्या महिनाभरात सुरू होईल की नाही याबद्दल मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे.

Tags:    

Similar News