संपूर्ण महाराष्ट्र होणार Online, muskच्या Starlinkशी झाला करार, देशातलं पहिलं डिजिटलमय राज्य होणारं!

Update: 2025-11-06 06:27 GMT

2021 पासून सुरु असलेल्या एलॉन मस्कच्या स्टारलिंक सॅटलाईट इंटरनेटला भारतात अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. Starlink satelllite Internet सुविधा सुरु करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरले आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगात आघाडीवर असेलल्या एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्टारलिंकसोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे.

यासंदर्भात त्यांनी एक्सवर माहिती दिली की,

महाराष्ट्र सरकारने स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी केली. यामुळे शासकीय कार्यालये, शाळा, आरोग्यकेंद्र, ग्रामीण भाग, गडचिरोली, नंदुरबार , धाराशिव आणि वाशिम यांसारख्या राज्यातील दुर्गम आणि वंचित भागांमध्ये उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी स्टारलिंकसोबत औपचारिकपणे सहयोग करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.

मस्क यांची स्टारलिंक ही माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. जिच्याकडे जगातील सर्वाधिक दळणवळण उपग्रह आहेत. ही कंपनी भारतात येत आहे आणि महाराष्ट्रासोबत भागीदारी करत आहे. हा आमच्यासाठी सन्मान आहे. असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1986044785359225218


स्टारलिंक इंटरनेटच्या High Speedमुळे जिथे इंटरनेट नाही त्याही ठिकाणी इंटरनेट पोहचणार आहे. तसेच वायरलेस ही इंटरनेट सुविधा असून मोठ्याप्रमाणावर Digital कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. नव्या तंत्रज्ञानाद्ववारे महाराष्ट्राला डिजिटलमय करण्यास राज्य सरकारने पाऊल उचललं आहे.


Similar News