संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या अखिल भारतीय

Update: 2021-10-10 17:14 GMT

शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले. सबंध देशभर जनतेमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध पक्ष व संघटनांनी महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.

अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने या बंदला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. किसान सभेच्या सर्व शाखा महाराष्ट्र बंद मध्ये अत्यंत सक्रियपणाने सहभागी होत आहेत. किसान सभेचे काम आलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये गाव, शहर, तालुका व जिल्ह्यामध्ये 'बंद' यशस्वी करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष व संघटनांच्या तातडीने बैठका घेऊन बंदचे नियोजन करण्याचे आवाहन किसान सभेने आपल्या शाखांना केले आहे.

जनतेने या बंदमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभा केले आहे.

Tags:    

Similar News