किरीट सोमय्या यांना घरातून बाहेर जाण्यास पोलिसांचा मज्जाव; भाजप आक्रमक

Update: 2021-09-19 14:49 GMT

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारमध्ये काही मंत्र्यांचा घोटाळ्याबाबत आरोप केले होते. त्यातच गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर त्यांनी आरोप केला. त्या अनुषंगाने किरीट सोमय्या आज रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोल्हापूरकडे रेल्वेने जाणार होते,मात्र तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांना घरी जाऊन बाहेर जाण्यास मज्जाव केला होता. हे सगळं होत असतानाच भारतीय जनता पार्टीचे बडे नेते विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते यांनी यावर रान उठवलं आणि अखेर सव्वा सहा वाजेच्या सुमारास किरीट सोमय्या हे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गिरगावकडे रवाना झाले. यादरम्यान भाजपाचे स्थानिक आमदार मिहिर कोटेचा आणि विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे हजर झाले त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि अखेर सव्वा सहा वाजेच्या सुमारास किरीट सोमय्या रवाना झाले. किरीट सोमय्या हे रवाना होताच त्या ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त सुद्धा काढण्यात आला.

Tags:    

Similar News