राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील जलयुक्त शिवार योजनेबद्दल म्हणाले...

Update: 2021-10-01 13:04 GMT

दुष्काळी मराठवाड्यात यंदा पावसानं चांगलाच हाहा:कार उडवला आहे. अतिवृष्टीमुळं मराठवाड्यात शेती पिकांचं आणि जमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील या पूरस्थितीला काही पर्यावरण तज्ज्ञांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला जबाबदार धरले आहे. मात्र, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेची पाठराखण केली आहे. जलयुक्त शिवारची काही कामं चांगली झाली आहेत. सर्वच कामं खराब नाहीत. जलयुक्त शिवारमुळे फायदे आणि तोटेही झाले आहेत, असं त्यांनी म्हटले आहे. तसंच तज्ज्ञांच्या मतावर मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

दरम्यान यावेळी भाजप-मनसे युतीच्या चर्चेवरुन जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपला मनसेसोबत युती करण्याची इच्छा आहे. मात्र, भाजप मनसेसोबत युती करायला लाजत आहे. मतदारांमुळे भाजप-मनसेसोबत युती करायला लाजत आहे, असा मिश्किल टोला पाटील यांनी लगावला. सोबतच शेतकऱ्यांना पैसे वाटून झाले आहेत. आता कारखानदारांकडे पैसे नाहीत. टॅक्स भरावा लागला तर कारखानदारी बंद पडेल. करदाता जगला पाहिजे, तरंच तो कर भरु शकेल. आयकर विभागाने व्यवहारिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Tags:    

Similar News