हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले. नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Update: 2021-07-23 10:08 GMT

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. रात्री 10 वाजल्यापासून तापी नदीपात्रात 1 लाख 6 हजार 122 क्युसेस पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात येत आहेत. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने रात्री आणखी पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तापी पाटबंधारे विभागाने सांगितलं आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील इतर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने मोठे तसेच लघूमध्यम प्रकल्पात पाणी साठा अजूनही कमीच आहे.

हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस असला तरी जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण आहे. मात्र, पाऊस झाला नाही. शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Tags:    

Similar News