देशात कोरोनाच्या अनेक लाटा येतील, राहुल गांधींचा मोदींना इशारा..

Update: 2021-05-28 10:08 GMT

कॉग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज देशातील कोरोना व्हायरसच्या परिस्थिती संदर्भात देशातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी लसीकरणाबाबत मी थेट पंतप्रधानांना म्हटले होते की, जर भारताने लसीकरणाचे योग्य नियोजन केले नाही तर एकदा नाही तर अनेकदा लोकं मरतील. एक-दोन लाटा नाही येणार तर लाटा येतच राहातील. कारण विषाणू बदलत राहील. त्यामुळे अनेक लाटा येण्याची भीती व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला मोदी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मोदी दुसऱ्या लाटेला समजूच शकले नाही. मोदी हे इवेंट मॅनेजर आहेत. अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर टीका केली आहे.

काय म्हटलंय राहुल गांधी यांनी...

मोदींची नौटंकी हे दुसऱ्या कोरोना लाटेचे कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. मोदींनी अजुनही कोरोनाला समजून घेतलेलं नाही.

मृत्यूंची आकडेवारी खोटी…

कोरोनाने मृत पावलेल्या लोकांची आकडेवारे खोटी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी. अशी मागणी देखील राहुल यांनी केली आहे.

लसीकरणावर भर...

कोरोना व्हायरसवरर मास्क आणि लॉकडाऊन हा तात्पुरता उपाय आहे. यासाठी देशातील सर्व नागरिकांना लस मिळायला हवी. लसीकरण हाच कोरोनावरील उपाय आहे.

पंतप्रधानांना करोना समजलाच नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करोना समजलाच नाही. असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

अनेकदा सरकारला करोना संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. आणि जसं की तुम्ही पाहिलं मोदींनी करोनाविरुद्ध विजय घोषित केला. त्यांनी करोनाला हरवलं असल्याचं जाहीर केलं. मात्र अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही.

देशात 3 टक्के लोकांचं लसीकरण…

देशात 3 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. देशात 97 टक्के लोकांचं लसीकरण बाकी आहे. त्यामुळं जर लवकरात लवकर लसीकरण केले गेले नाही. तर देशात कोरोनाच्या अनेक लाटा येण्याची भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News