31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ

मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील मुंबईत शिरकाव केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे

Update: 2021-12-31 02:18 GMT

मुंबई // मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील मुंबईत शिरकाव केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासन सतर्क झाले असून नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे, सोबतच नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईच्या सीमेवर रात्रीपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, मुलुंड टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण मुंंबईमध्ये येत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून नववर्षाच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. यंदा काही प्रमाणात रुग्णसंख्या घटल्याने कोरोना संकट टळल्याचे बोलले जात होते. मात्र, पुन्हा एकदा ओमिक्रॉनने डोकेवर काढले आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नववर्षाचे स्वागत घरी राहूनच करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनीही केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जे वाहनचालक कोरोना नियमांचे आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. वाहनधारकांना मुंबईत येण्याचे कारण, तसेच वाहनाचे वैध कागदपत्रांची देखील विचारणा होत आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तसेच संभाव्य घातपात टाळण्यासाठी तपासणी मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Tags:    

Similar News