शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांच्यावर इन्कम टॅक्सची कारवाई सुरुच, २ कोटी रुपये जप्त; १०० कोटींचा घोटाळ्याचा आरोप

Update: 2022-02-27 09:33 GMT

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्यावर इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली होती. हि कारवाई अद्यापही सुरु आहे.आतापर्यंत त्यांच्याकडुन २ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.यशवंत जाधवांनी सुमारे १०० कोटींचा घोटाळा केल्याची माहिती आहे.

जाधव यांचे निकटवर्तीय विमल अग्रवाल आणि मुंबई महापालिकेचे ५ कंत्राटदार आणि यंशवंत जाधव कुटुंबीयांच्या ३३ जागेंवर छापे टाकण्यात आले होते.त्यांची कारवाई अद्याप ही सुरु आहे.अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.मुंबईचे माजी पोलिस महासंचालक परमवीर सिंह यांनी खंडणी मागितल्याची फिर्याद दिल्यानंतर चौकशीचे चक्रे फिरली होती.त्यात जाधव यांनी मोठा गैरव्यव्हार केल्याचे उघड झाले होते.इन्कम टॅक्सने तपासात पुरावे गोळा केले आहेत.

स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांना मोठे आर्थिक प्रस्ताव मंजुर करण्याचे अधिकार आहेत.त्यांनी दरवर्षी १२ हजार कोटी प्रस्ताव नागरी कामांसाठी मंजुर केले.कंत्राटदारांकडुन बेकायदा माया जमवुन कर बुडवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढु लागल्याने त्यांच्यावर इन्कम टॅक्सने छापे टाकले आहेत.विशेष म्हणजे शिवसेनेची सत्ता गेली अनेक दशके पालिकेवर आहेत.ऐन महापालिकेच्या तोंडावर इन्कम टॅक्सने छापे टाकून शिवसेनेचा भ्रष्टाचार उघड केला आहे.

यशवंत जाधव यांच्या पत्नी आणि भायकळा येथील आमदार यामिनी जाधव यांची गेल्या वर्षी चौकशी करण्यात आली होती.२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यावरुन अधिकाऱ्यांना संशय आला होता.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

Tags:    

Similar News