कोरोनाचा सामूहिक संसर्ग? ICMRने काय दिली माहिती?

Update: 2020-06-12 01:30 GMT

भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी देशात सामूहिक संसर्ग झालेला नाही अशी माहिती इंडियन काऊन्सिल ऑफं मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR ने दिली आहे.

ICMRचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. "भारतासारख्या मोठ्या देशात कोरोनाच्या प्रसाराचे प्रमाण खूप कमी आहे, छोट्या जिल्ह्यांमध्ये प्रसाराचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि शहरी भागात हे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा थोडे जास्त आहे. तर कंटेनमेंट झोनमध्ये हे प्रमाण आणखी थोडे जास्त आहे. "असे भार्गव यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा...

आनंदाची बातमी: ‘हा’ पूर्ण जिल्हा झाला कोरोना मुक्त, जिल्ह्यात आज एकही रुग्ण नाही…

टाळेबंदीचा अतिरेक नको!

Exclusive Report #coronaeffect: राष्ट्रीय रंगमंच गाजवणारा कलाकार विकतोय भाजीपाला

असे असले तरी आता खबरदारी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर चाचण्या, कोरोनाबाधीत रुग्णांचा शोध, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आणि विलगीकरण ही रणनीती कायम ठेवावी लागणार आहे. आतापर्यंत याचा फायदा देशात झाला आहे. देशात सध्या दिवसाला दीड लाख लोकांच्या चाचण्या होत आहेत, तर दर दिवसाला दोन लाख चाचण्या करण्याची क्षमता असल्याचेही भार्गव यांनी म्हटले आहे.

Similar News