Home > मॅक्स रिपोर्ट > Exclusive Report #coronaeffect: राष्ट्रीय रंगमंच गाजवणारा कलाकार विकतोय भाजीपाला

Exclusive Report #coronaeffect: राष्ट्रीय रंगमंच गाजवणारा कलाकार विकतोय भाजीपाला

Exclusive Report #coronaeffect: राष्ट्रीय रंगमंच गाजवणारा कलाकार विकतोय भाजीपाला
X

ज्याने दिल्ली येथे असणाऱ्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतले आहे, ज्याने राज्य अन राष्ट्रीय स्तरावर अनेक नाटकं गाजवली आहेत, ज्याचं निवड हिंदी सिरियलमध्ये झाली आहे अशा कलाकारावर, आज भाजीपाला विकण्याची वेळ आलीय..मात्र तो डगमगता परिस्थितीशी दोन हात करत आज बीड शहरात गल्लोगल्ली भाजीपाला विकतोय...

हे आहेत रविकुमार धुताडमल..ज्यांनी बीडच्या बलभीम महाविद्यालयात शिक्षण घेतलं, मुंबई येथील विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात पदवी घेतलीय..पुढे दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण झालं अन तिथं अनेक वर्षे शिकवलं देखील..त्यानंतर त्यांची निवड एका हिंदी सिरियालमध्ये देखील झाली..मुंबईमध्ये शूटिंग सुरू असतांना तिसऱ्याच दिवशी लॉकडाऊन झालं, त्यामुळं गावाकडे यावं लागलं..आल्यानंतर अनेक दिवस आर्थिक चणचण भासली नाही..मात्र लॉकडाऊन वाढतच गेल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या..घरात दोन भावंडं आहेत..मात्र त्यांचा व्यवसाय बेंजो पार्टीचा असल्याने, तो देखील लॉकडाऊन मूळ बंद झाला..त्यातच 17 व्यक्तींचं कुटुंब असल्याने एक ना अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या..यामुळं दिल्ली येथे अनेक वर्षे काढलेल्या कलाकार रविकुमार यांनी, अत्यावश्यक सेवेत येणारा भाजीपाला जो लॉकडाऊनमध्ये देखील विकला जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्यांनी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय, एका भावाला सोबत घेऊन सुरू केला..दिल्लीत राहून, राष्ट्रीय स्तरावर मोठमोठी नाटकं करून, अनेक मोठ्या कलाकारांसोबत उठबस असतांना देखील, न डगमगता रवीकुमार हे, गाड्यावर भाजीपाला घेऊन बीड शहरातील विकत आहेत.

यावर रविकुमार म्हणतायत की कलाकाराला वेळेनुसार राहता आलं पाहिजे. मी बीड शहरात राहतो म्हणून मला ही कल्पना सुचली..आज माझ्यासोबत माझे दोन भाऊ आहेत..मात्र आज अनेक कलाकार आहेत..ज्यांच्या जीवावर पूर्ण कुटुंब चालतं..आज लोककला जिवंत ठेवणारे अनेक कलाकार अडचणीत आहेत..ज्यांचं आयुष्य कलेसाठी गेलंय अन आता वय जास्त आहे..अशा अनेक कलाकारापुढं समस्या निर्माण झाल्या आहेत..आज एखाद्याचा भूकबळी देखील जाऊ शकतो..त्यामुळं सरकारने आज कलाकारांकडे लक्ष देण्याची गरज आहे..

रविकुमार यांचे मोठे बंधू सांगतात की माझा भाऊ मोठा कलाकार आहे..लॉकडाऊन असल्यानं त्याला इथं बोलावलंय..मात्र कुटुंबात 17 व्यक्ती आहेत. त्यामुळं घरात बसून भागत नाही..आमचा व्यवसाय देखील बंद झाला आहे..त्यामुळं मी भाजीपाला विकण्याची कल्पना सुचवली..लागलीच रवीने भाजीपाला विकण्यास सुरुवात केली..कुणापुढं हात न पसरता स्वाभिमानाने जगण्यासाठी आम्ही हे करतोय..मात्र आज आम्ही घरात तिघे जण कर्ते आहोत म्हणून काहीपण करू शकतोय. परंतु अनेक कलाकारांच्या कुटुंबात एकट्याच्या जीवावर घर आहे..त्यामुळं अशा कलाकारांकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे...

A student from NSD is selling vegetables in Beed city of maharashtra due to lockdown

लॉकडाऊनमुळे लोककला जिवंत ठेवणारे अनेक कलाकार अडचणीत आहेत..जागरण गोंधळ करणारे, तमाशा कलावंत, वाघ्या मुरुळी, पोतराज, डोंबारी असे एन अनेक कलाकार काम बंद असल्याने मोठ्या अडचणीत सापडले आहेत..यामुळं सरकारने कलाकारांकडे दुर्लक्ष न करता आज लक्ष देण्याची गरज आहे.

Updated : 11 Jun 2020 11:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top