देशात बनावट बायोडिझेलची अवैध विक्री ; डीलर्स असोसिएशनची तक्रार

शासनाचा महसुल बुडवून देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी बनावट बायोडिझेलची सर्रास विक्री होत असल्याची तक्रार पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने केली आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टपासून खरेदी बंद आंदोलन करण्याचा इशारा डीलर्स असोसिएशनने दिला आहे.

Update: 2021-07-27 09:08 GMT

देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी बनावट बायोडिझेलची सर्रास विक्री होत असल्याची तक्रार पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने केली आहे. असे अवैध पंप चालक हे बिनधास्तपणे बनावट बायोडिझेलची बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याने अधिकृत पंप चालकांना याचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. अशा बनावट बायोडिझेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नांदेड पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

नांदेड पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनच्या वतीने सुमारे 40 सदस्यांनी जिल्हाधिकारी व इतर संबधित प्रशासनाला एक निवेदन पाठवले आहे. तसेच हे गैरप्रकार लवकर बंद न केल्यास येत्या 15 ऑगस्टपासून खरेदी बंद आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.

शासनाच्या बी100 च्या बायोडिझेलच्या नावाखाली ही मंडळी बनावट उत्पादने विकत असल्याचे निवेदनात म्हटलं आहे.

बनावट बायोडिझेल हे भारत सरकारच्या आयसीएल, बीपीसीएल , एचपीसीएल पेक्षा बरेच स्वस्त असल्याने ग्राहक देखील त्याचा वापर करत असल्याने अधिकृत विक्रेत्यांना याचा फटका बसत आहे. सोबतच अशा अवैध व्यापारामुळे सरकारचाही महसूल बुडत असल्याचे देड पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने म्हटले आहे .

Tags:    

Similar News