केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

Update: 2021-09-26 11:39 GMT

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दिल्लीत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अनुपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे हे देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती मिळते आहे. तसेच सीमा भागातील सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा देखील घेतला गेला. दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये ही बैठक पार पडली.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लगेचच मुंबई यायला निघाले आहेत. या बैठकीबद्दल अमित शाह यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. "नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नक्षलवादावर सविस्तर चर्चा केली. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारं आणि केंद्र सरकारमध्ये योग्य समन्वय राखण्यावर भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे आम्ही नक्षलवाद्यांना लगाम घालण्यात यशस्वी झालो आहोत. आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित काम करत आहेत, कारण जोपर्यंत नक्षलवादाची समस्या पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत नक्षलग्रस्त राज्यांचा पूर्ण विकास शक्य नाही" असे त्यांनी सांगितले आहे.

Tags:    

Similar News