'हिंदू धर्म खतरे में है' हे काल्पनिक, अमित शहा यांच्या मंत्रालयाची माहिती

Hindu Religion is in danger RTI Activist Ask question to Central Ministry Ans it is fictitious भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची माहिती

Update: 2021-09-19 12:16 GMT

नागपुरचे सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडून माहिती अधिकाराअंतर्गत देशातील हिंदू धर्म धोक्यात असल्याचे काही पुरावे मागितले होते. मात्र, गृहमंत्रालयाने यावर उत्तर देतांना "हिंदू धर्म धोक्यात असल्याची गोष्ट" काल्पनिक असल्याचं म्हटलं आहे.

मोहनीश जबलपुरे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं,

"आपण नेहमीच सोशल मीडियावर तसेच नेत्यांच्या भाषणांमध्ये ही गोष्ट ऐकत असतो की, 'हिंदू धर्म धोक्यात आहे.' त्यामुळे मला असं वाटलं की, आपण याबद्दल अधिक माहिती घ्यायला हवी, आणि त्यासाठी मी भारत सरकारच्या गृहमंत्रालयाला माहिती अधिकारा अंतर्गत अर्ज केला.

"जर हिंदू धर्म धोक्यात आहे आणि त्याचे काही पुरावे तुमच्याकडे असतील तर मला त्याची एक प्रत दिली जावी"

मात्र, गृहमंत्रालयाकडे देशातील हिंदू धर्म धोक्यात असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाही. तेव्हा गृह मंत्रालयाकडून उत्तर आले की,

"फक्त अशी माहिती प्रदान करता येते. जी माहिती अगोदरच आमच्याकडे असेल. केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्याला माहिती निर्माण करणे, माहितीचा अर्थ लावणे, अर्जदाराने उपस्थित केलेल्या समस्या सोडवणे किंवा काल्पनिक प्रश्नांची उत्तरे देणं अपेक्षित नाही.

असं उत्तरात म्हटलं आहे.




दरम्यान, अर्जामध्ये मागितलेली माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला माहित नसली तरी देशातील बऱ्याच नेत्यांना माहित आहे. कारण ते सतत आपल्या भाषणात 'हिंदू धर्म धोक्यात आहे' असं सांगत असतात.

यावर मोहनीश जबलपुरे म्हणतात - "खोट्या अफवा पसरवणारे तसेच हिंदू धर्म धोक्यात आहे असं सांगून असंविधानिक गोष्टी समोर आणू पाहणारे. जसं की, "हिंदुराष्ट्र" या गोष्टी ज्या असंविधानिक आहेत. हे ऐकून आश्चर्य वाटतं की, देशातील बहुसंख्य लोक हिंदू धर्माचे असतांना हिंदू धर्म धोक्यात कसा येऊ शकतो. मग फक्त काही नेत्यांना फायदा व्हावा यासाठी रचलेलं हे सगळं षड्यंत्र असतं का?

असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

Tags:    

Similar News