कोकणात ढगफुटीसदृश्य पाऊस; अनेक घरांमध्ये, दुकानात शिरले पाणी.

Update: 2021-09-07 14:40 GMT

राज्यात या महिन्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा गेल्या चोवीस तासांत ढगफुटी सदृश्य पाउस झाला आहे. कोकणात जुलै महिन्यात आलेल्या पुराच्या पार्श्वभुमीवर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

या मुसळधार पावसामुळे मुरुड तालुक्यातील मुरुड शहर, मांडला, बोर्ली, चोरढे, माजगाव, खारीक वाडा, खारदोडकुले या गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले होते. त्यामुळे मुरुडकरांनी सबंध रात्र जागून काढली.

मंगळवारी सकाळ पर्यंत पाणी ओसरले आहे. नागरिक आपल्या घरात व दुकानात साचलेला चिखल बाहेर काढून झालेल्या नुकसानीचे माहिती घेत आहेत. यात अनेक दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरले असल्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोकणातील गणेशोत्सव हा किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गणेशोस्तव जवळ आला असून त्यासाठीच्या वस्तू विक्री करणाऱ्या दुकानदारांना नक्कीच मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

Tags:    

Similar News