कोल्हापूरला पुराचा तडाखा, NDRF तर्फे बचावकार्य

Update: 2021-07-22 05:20 GMT

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता चांगलाच वाढला आहे. शहरातील रामानंदनगर, राधिका कॉलनीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दोन राज्यमार्ग, एका राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त होते आहे. संभाव्य धोका लक्षात घेता NDRFच्या 2 टीम कोल्हापुरात बोलावण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनेक मुख्य रस्ते पुरामुळे बंद झालेत. कोकणात जाणारा मार्ग गगनबावडा इथे बंद झाला आहे. तर रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर अऩेक भागात नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने छोटे रस्तेही वाहुतकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

Tags:    

Similar News