हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया, ''माझे जीवन हे सगळ्या लोकांच्या समोर आहे..''

Update: 2023-01-11 07:02 GMT

माझ्या घरावर माझ्या नातेवाईकांच्या घरावर त्यानंतर माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापेमारी सुरू आहे. मी काही कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे सर्व माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी शांतता ठेवावी आत्ताच मी प्रसार माध्यमांमध्ये कारखाना अगोदर बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. ती कृपया मागे घ्यावी त्या सहकारी अधिकाऱ्यांना आपण संपूर्णपणे सहकार्य करावं एवढी विनंती करतो. यापूर्वीही अश्या प्रकारची छापे पडले होते सगळी माहिती केंद्रीय यंत्रणांनी घेतली होती. पुन्हा कशासाठी छापा टाकला आहे मला माहिती नाही. गेल्या 30-35 वर्षाचे माझे जीवन हे सगळ्या लोकांच्या समोर आहे. आणि त्यामुळे दोन वर्षांमध्ये सुद्धा जी कारवाई झाली त्यातून काही निष्पन्न झालं नाही. मी सगळी कल्पना घेतल्यानंतर प्रसार माध्यमां समोर बोलणार आहे असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर ईडीने (Enforcement Directorate - ED ) छापेमारी केली आहे. कागलमधील त्यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. मुश्रीफ यांच्या घरी चौकशी करण्यात येत आहे. शिंदे सरकार (shinde fadnavis government) सत्तेत आल्यानंतर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांआधी किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी ट्विटच्या माध्यमातून कारवाईचा इशारा दिला होता त्यानंतर आता ही मोठी कारवाई होत आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील (appasaheb nalawade sugar factory) १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता ही मोठी कारवाई होत आहे. ईडीचे जवळपास २० अधिकारी आज सकाळी सहाच्या सुमारास हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले.


Video will upload soon 

Tags:    

Similar News