सदावर्ते आता राजकारणात,राष्ट्रवादीला थेट आव्हान

Update: 2022-05-08 13:21 GMT

वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते आता राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसत आहेत.सदावर्ते आथा एसटी महामंडळ सहकारी बॅंकेच्या निवडणूकीत आपलं पॅनल उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

अनेक वर्षापासून बँकेवर राष्ट्रवादीचं काँग्रेसचं(ncp) वर्चस्व आहे. त्यामुळं आपलं पॅनल उभा करत आणि त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना उमेदवाऱ्या देऊन सदावर्तेंकडून थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पर्यायानं शरद पवारांना आव्हान देण्यात येणार आहे. पण आम्ही यंग हिंदुस्तानी असून वयोवृद्ध पुढाऱ्यांशी आमची लढाई नाही, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

पुढे सदावर्ते म्हणाले एसटी महामंडळाची बँक ही सहकाराची बँक असून ती एक स्टेट आहे. ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून देण्याची प्रक्रिया आहे, ती कोणाच्या बापाच्या घरची व्यवस्था नाही. कोणाला इथं भ्रष्टाचारासाठी मोकळीक दिलेली नाही. त्यामुळं कष्टकरी एसटी कर्मचारी आपली स्वतःची माणसं निवडतील. आत्तापर्यंत या बँकेवर पॉलिटिकल बॉस उभे केले जात होते, ही बुजगावणी एसटी कर्मचाऱ्यांना १४ ते १५ टक्के व्याजानं कर्ज द्यायचे, यातून त्यांचं प्रचंड शोषण होत होतं. इतर राज्यांसाठी मात्र ७ ते ८ टक्के व्याजदर दिला जातो. आमची बँक, आमचा पैसा, आमचे कष्ट, आमचे श्रम आणि पैसा असतानाही या राजकारण्यांकडून आपल्या मर्जितल्या लोकांना आणि इतर राज्यांना कर्जे दिली जातात. आमचं म्हणणं आहे की तिकडं सात टक्के देता तर इथं का नाही?

ड्रायव्हर, कंडक्टर किंवा मेकॅनिकल आदींना आम्ही आमच्या पॅनलच्या माध्यमातून उमेदवारी देऊ. बँकेत आमचे ९५ टक्के सभासद आहेत. आमची लढाई आम्ही विना दारु, विना प्रलोभनाची लढू, अशा प्रकारे एसटी कर्मचारी आपलं हक्काचं स्थान निर्माण करतील यामध्ये आम्हाला काही शंका नाही तो त्यांचा अधिकार आहे, असंही सदावर्ते यांनी म्हटलं.

एसटी कर्मचाऱ्यांचा लढा लढत असताना अॅड. सदावर्ते यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. याच्या चौकशीसाठी त्यांना काही काळ तुरुंगातही जावं लागलं होतं.

Tags:    

Similar News