अर्णब गोस्वामींना संवेदनशील माहिती कोणी पुरवली? पृथ्वीराज चव्हाण

Update: 2021-01-17 12:50 GMT

मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे संभाषण अत्यंत गंभीर आहे. अर्णब गोस्वामींना संवेदनशील माहिती कोणी पुरवली? असा प्रश्न उपस्थित करत संसदीय संरक्षण समितीनेदेखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, असे मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटर द्वारे व्यक्त केलं आहे.

अर्णब गोस्वामींना संवेदनशील माहिती कोणी पुरवली असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटद्वारे या सर्व प्रकरणावर शंका व्यक्त केली आहे. रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे व 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

चव्हाण यांनी आज केलेल्या ट्विट मध्ये मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते घटनाबदल आणि राजकीय नेमणुकांची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली? केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. संसदीय संरक्षण समितीनेदेखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी असे म्हटले आहे.

अर्णब गोस्वामी यांनी या संवादात पार्थदास गुप्ता यांना दिलासा देताना सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत असं म्हणत असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय पुलावामा येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्याबाबत अर्णब गोस्वामी यांचे आक्षेपार्ह विधानं आढळून आले आहेत. तसेच पुढे या संवादात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख बिनकामी ( युजलेस) असा करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार पुढे आल्यानंतर समाजमाध्यमांवर तसेच राजकीय नेत्यांकडून गोस्वामी यांचावर टीकेचा भडीमार चालू आहे.

Tags:    

Similar News