योगी सरकारची आकडेवारी खोटी, रस्त्यावर जळतायेत प्रेत...

Update: 2021-04-19 07:59 GMT

सौजन्य - सोशल मीडिया

उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद मध्ये रस्त्याच्या कडेला जळणाऱ्या मृतदेहांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारत समाचारचे पत्रकार लोकेश राय यांनी गायिजाबाद येथील स्मशान भूमीत जाऊन एक ग्राउंड केला आहे. या रिपोर्टमधून उत्तर प्रदेश सरकारचा खोटेपणा समोर आला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाने 18 एप्रिलला 500 लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकार मृत व्यक्तींची आकडेवारी कशा प्रकारे लपवत आहे. हे या व्हिडीओतून समोर आलं आहे.

कोरोना महामारीच्या काळात सरकार करोनाने मृत्यू झालेल्या लोकांच्या आकडेवारी कशा पद्धतीने लपवत आहे. भारत टीव्हीने केलेल्या एका रिपोर्टमधून समोर आलं आहे.


गाजियाबादमधील हिंडण स्मशान घाटच्याबाहेर फूटपाथ वर प्रेत जाळण्यासाठी सरकारने चौथरे तयार केले आहेत. काही दिवसांपूर्वीच या फूटपाथवर प्रेत जाळण्यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे. सरकारी आकडेवारी नुसार गेल्या ५ दिवसात मृतांची संख्या फक्त दोन दाखवण्यात आली आहे. आणि स्मशानभूमीवर दररोज ४०-४५ प्रेत येत आहेत. ज्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे देखील मृतदेह आहेत.


इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊनही सरकार ही खोटी आकडेवारी सांगत आहेत? या ठिकाणी गेल्या ४ दिवसांत १८० शव जाळण्यात आले आहेत.

भारत टीव्ही ने केलेल्या रिपोर्टनुसार या ठिकाणी भाजप नेत्यांच्या नातेवाईकाचे शव आणण्यात आलं आहे. आणि अंत्यविधीला आलेल्या लोकांनी पीपीई कीट ही घातलेलं नाही. असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहेप्रशासनाला ज्या गोष्टींची सुविधा करायला हवी होती. ती करण्यात आलेली नाही. तसेच या ठिकाणी जळणारे अनेक शव या गोष्टीचा पुरावा देत आहे की, सरकार मृतांची संख्या कशापद्धतीने लपवत आहे. सतत या ठिकाणी शव येत आहे.


हे जळणारे प्रेत पाहून सरकार खरी परिस्थिती लपवण्याचा का प्रयत्न करत आहे. असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Tags:    

Similar News