#blacklivesmatter- जॉर्ज फ्लॉईडला अखेरचा निरोप, वर्णद्वेषविरोधी लढ्याचा निर्धार

Update: 2020-06-10 03:01 GMT

अमेरिकेतील मिनियापोलिस इथे पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झालेल्या जॉर्ज फ्लॉईड याच्या पार्थिवाचा दफनविधी ह्युस्टन शहरात पार पडला. जॉर्जला त्याच्या आईच्या थडग्याशेजारी दफन करण्यात आले. पण यावेळी जॉर्ज फ्लॉईड याच्या कुटुंबीयांसह उपस्थित असलेल्या सगळ्यांनी अमेरिकेतील वर्णद्वेषाविरोधात लढण्याचा निर्धार केला.

जॉर्जची भाची ब्रुक विल्यम्स हिने जॉर्ज यांची केवळ हत्या नसून तो वर्णद्वेषी गुन्हा आहे, असे सांगत, सरकारवर टीका केली. कृष्णवर्णीयांविरोधात बनवले गेलेल्या कायद्यांमुळे आफ्रिकन-अमेरिकन व्यवस्था अपयशी ठरली आहे.हे कायदे बदलण्याची मागणी तिने केली. "कुणी तरी म्हटले आहे की अमेरिकेला पुन्हा महान बनवायचे आहे, पण महान कधी होती?" असा सवालही तिने विचारला आहे.

हे ही वाचा..

एक होता जॉर्ज!

अस्वस्थ अमेरिका : लॉस एंजेलिसमधून ग्राऊंड रिपोर्ट

अखेर डोनाल्ड ट्रम्प एकटे पडले!

Similar News