किरण बेदींना कोवीड-19 मंत्रालय? काय आहे सत्य?

Update: 2020-07-27 01:40 GMT

पाँडिचेरीच्या नायब राज्यापाल किरण बेदी (Kiran Bedi) यांच्याबद्दल सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. किरण बेदी यांना दिल्लीत बोलावले जाणार असल्याची चर्चा असून त्यांना नव्याने तयार करण्यात येत असलेल्या कोव्हीड-19 (covid-19) मंत्रालयाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा...

राज्यात 24 तासात पुन्हा 9 हजारांच्यावर रुग्ण

बाबू समझो इशारे….

“मी ब्राह्मण आहे ……..??”

राज्याचे मुख्यमंत्री कुणाच्या पाठिशी? तुकाराम मुंढेंच्या की नागपूर महापालिकेच्या?

1 ऑगस्टपासून त्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. तसेच किरण बेदी या संपूर्ण देशातील कोरोनाविरोधातल्या लढ्याची माहिती थेट पंतप्रधान कार्यालयाला देतील असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. किरण बेदी यांच्या जागी एल. गणेशन यांना पाँडिचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्त केले गेल्याचेही सांगण्यात आले आहे.

पण किरण बेदी यांनी या वृत्ताचे तातडीने खंडन केले आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे, “मला कोव्हीड मंत्रालयाची जबाबदारी दिली गेल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण असा कोणताही निर्णय़ मला कळवण्यात आलेला नाही, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये”, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच, पाँडिचेरीमध्ये कोरोनोविरोधतल्या लढाईत नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहनही किरण बेदी यांनी केले आहे.

Similar News