मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याची संपत्ती EDने केली जप्त

Update: 2022-03-22 13:01 GMT

केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा राज्यातील वेग आता आणखी वाढला आहे. EDने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहूणे रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पाटणकर यांच्या कंपनीची 6.45 कोटींची संपत्ती ED कडून जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये ठाण्यातील ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. पुष्पक ग्रृप प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन ही कारवाई केली आहे. "श्रीधर पाटणकर उद्धव ठाकरे यांचा साला (मेव्हणा) यांच्यावर मनी लाँडरिंग प्रकरणी कारवाई. बनावट कंपन्यांचा वापर केला आहे. ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली आहे. घोटाळेबाजांना सोडणार नाही" असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Full View

एकीकडे भाजप आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष चिघळलेला असताना आता थेट मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी याआधी अलिबागमधील १९ बंगल्यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले होते. तसेच ठाकरे परिवारावर ते सातत्याने गैरव्यवहाराचा आरोप करत आहेत. त्यामुळे या कारवाईने आता EDने थेट ठाकरे यांच्या घरात हात घातल्याची चर्चा सुरूव झाली आहे.

Similar News