दिलीप गांधी यांचं निधन, ती फेसबूक पोस्ट चर्चेत

दिलीप गांधी यांचं निधन, ती फेसबूक पोस्ट चर्चेत

Update: 2021-03-17 03:48 GMT

माजी खासदार दिलीप गांधी यांचं आज पहाटे निधन झालं. ते 70 वर्षाचे होते. त्यांना कोरोना झाला होता. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2003 ते 2004 साली केंद्रात जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री होते.

दिलीप गांधी यांनी लोकभेत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं. 1999 मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2009, 2014 ला ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले. 2019 ला भाजपने त्यांना तिकिट नाकारून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांना तिकिट दिलं होतं.

25 फेब्रुवारीला त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली होती. त्यामध्ये ते म्हणतात 'संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात.' संकटाला सतत सामोरं जाणारा नेता आणि परिस्थिती समोर हार न मानता सतत लढत राहण्याचा संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला. मात्र, कोरोनासारख्या आजाराने त्यांचा घात केला.

https://www.facebook.com/dilipmgandhimp/posts/१७३१२४११२३७२४२८४




 


Tags:    

Similar News