ठाण्यात कृत्रिम तलावात बाप्पांच्या विसर्जनाला भाविकांचा प्रतिसाद

Update: 2021-09-13 01:27 GMT

प्रातिनिधिक छायाचित्र

ठाणे शहरात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी पार पडले. यंदा शहरातील दीड दिवसांच्या तब्बल 8 हजार 979 बाप्पांचे विसर्जन झाले आहे. यंदा देखील ठाणे महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाकडे भाविकांचा प्रतिसाद दिसून आला.

यासाठी 2952 नागरिकांचं ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग महापालिकेच्या केंद्रामध्ये प्राप्त झाले, एकूण 21 गणेशमूर्तींचे तसेच 19 सार्वजिनक गणेशमूर्तींचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्यावेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार करण्यात आली ज्याद्वारे ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधेंतर्गत 2952 नागरिकांनी बुकिंग करत बाप्पांचे विसर्जन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद मिळाल्याचे महापौर नरेश गणपत आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले. त्यांनी महापालिकेच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले.

Tags:    

Similar News