इयत्ता दहावीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर ; १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार परीक्षा

इयत्ता दहावीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहे.

Update: 2021-12-21 10:52 GMT

मुंबई // दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमधील संभ्रम दूर झाला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियमित मूल्यमापन पद्धतीनेच ऑफलाईनहोणार असल्याचं राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात जाहीर केलं होतं. आता या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा या १५ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहे.

असे असेल इयत्ता दहावीचे वेळापत्रक

दिनांक- १५ मार्च- प्रथम भाषा

दिनांक-१६ मार्च- द्वितीय वा तृतीय भाषा

दिनांक- २१ मार्च- हिंदी

दिनांक- २२ मार्च- संस्कृत, उर्दू, गुजराती आणि इतर द्वितीय आणि तृतीय भाषा

दिनांक- २४ मार्च- गणित भाग-१

दिनांक- २६ मार्च- गणित भाग-२

दिनांक- २८ मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १

दिनांक- ३० मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २

दिनांक- १ एप्रिल- सामाजिक शास्त्र पेपर १

दिनांक- ४ एप्रिल- सामाजिक शास्त्र पेपर २

याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.

या दिवशी लागणार निकाल

इयत्ता १२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागेल तर १० वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील असं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी म्हटले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करून परीक्षा घेतल्या जातील.

Tags:    

Similar News