देशातील सर्वात मोठं ट्विन टॉवर अवघ्या काही सेकंदात जमीनदोस्त ; पाहा व्हिडिओ

Update: 2022-08-28 10:29 GMT

अवघ्या काही सेकंदात देशातील सर्वात उंच उमारत जमीनदोस्त झाली आहे. ही इमारत कुतुबमिनारपेक्षा उंच होती असे म्हटले जात होते. ही इमारत पाडण्यासाठी 3 हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला.

उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) येथे अवैधरित्या बांधलेले ट्विनटॉवर (Supertech Twin Towers) अखेर पाडण्यात आले आहे. अवघ्या काही सेकंदात देशातील सर्वात उंच उमारत जमीनदोस्त झाली आहे. ही इमारत कुतुबमिनारपेक्षा उंच होती असे म्हटले जात होते. ही इमारत पाडण्यासाठी 3 हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्वीन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. ही इमारत पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती. अखेरी ही इमारत पाडण्यात आली आहे.

नोएडामधील सुपरटेकच्या ट्विन टॉवर्सभोवती सुमारे 500 पोलीस आणि वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले होते आणि या मोहिमेसाठी नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे दुपारी 2.15 ते 2.45 दरम्यान बंद ठेवण्यात आला होता. प्राधिकरणांनी ड्रोनसाठी शहरावर नो-फ्लाय झोन स्थापित केला होता. स्फोटाच्या वरील एक नॉटिकल मैल रेडियसमधील जागा देखील हवाई उड्डाणासाठी अनुपलब्ध ठेवण्यात आली होती. ट्विन टॉवरचा ढिगारा हटविण्यासाठी 3 महिने लागणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत तीन हजार किंवा त्यापेक्षा जास्त ट्रक भरून ढिगारा हटविला जाईल.

मंजूर केलेल्या बिल्डिंग प्लॅननुसारच ट्विन टॉवर्स बांधले : सुपरटेक

नोएडा विकास अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या बिल्डिंग प्लॅननुसार ट्विन टॉवर्स बांधण्यात आले आणि त्यात कोणतेही बदल करण्यात आले नाही, असे सुपरटेकने म्हटले आहे. तर रिअल्टर फर्मने हे दोन टॉवर पाडल्याने त्याच्या इतर रिअल इस्टेट प्रकल्पांवर परिणाम होणार नाही असे म्हटले आहे.

Tags:    

Similar News