राज्यात कोरोना रुग्णवाढ कायम, तर मुंबईत रुग्णसंख्येत घट

राज्यात कोरोनाची घोडदौड कायम आहे. तर मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट आढळून आली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 46 हजार 406 रुग्ण आढळून आले. तर मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत 3 हजार इतकी घट झाली आहे.

Update: 2022-01-13 16:24 GMT

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्याचे टेन्शन वाढले आहे. तर गेल्या 24 तासात 46 हजार 406 इतके रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्याची रुग्णसंख्या 46 हजारांवर कायम आहे. तसेच मुंबईत (Mumbai Corona Update) गेल्या 24 तासात 13 हजार 702 इतके रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासह राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 94.39 टक्के इतका झाला आहे.

मुंबईतील कोरोनामुक्तीचा दर 88 टक्के इतका आहे. मुंबईचा कोरोना बाधितांचा मृत्यूदर 1.85 टक्क्यांवर तर राज्याचा मृत्यूदर 2 टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र मुंबईतील कोरोना दुपटीचा दर 36 दिवसांवर पोहचला आहे, त्यामुळे राज्याचे टेन्शन वाढले आहे.

आतापर्यंत राज्यात 1 हजार 367 ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक 627 रुग्ण मुंबईत आढळले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील 775 रुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे गुरूवारी राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण सापडला नाही.

गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. पण आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. यावेळी देशात लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याचे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सांगितले.

Tags:    

Similar News