कंगनावर पुन्हा गंडांतर

सतत वादाच्या भोवऱ्यात असणारी अभिनेती कंगना राणावत आता उच्च न्यायालयानं आदेश देऊनही कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुन्हा अडचणीत सापडली आहे. तिच्याविरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल झाला आहे.

Update: 2021-01-19 11:11 GMT

एखाद्या समाजाबद्दल सोशल मीडियावर द्वेषपूर्ण व अवमानकारक पोस्ट केल्याप्रकरणी कंगना व तिची बहीण रंगोली चंडेल या दोघींची चौकशी करण्याचे आदेश मुंबई महानगर दंडाधिकारी कोर्टाने दिले होते. चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील कोर्टानं मुंबई पोलिसांना दिले होते. कंगना बहीण रंगोली हिने तबलिगी समाजाबद्दल द्वेषयुक्त व अपमानकारक ट्विट केले होते. याविरोधात अ‍ॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

त्यानंतर मोहम्मह अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे सत्र न्यायालयात तक्रार केली होती. हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवत आहे. कंगना ही अनेकवेळा आक्षेपार्ह ट्विट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला होता. कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अनेक दिवसांपासून कंगना ही सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे.

शिवसेना आणि कंगना यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले होते. याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या बंगल्यावर केलेली कारवाई देखील चर्चेचा विषय बनला होता. राणावत यांनी द्वेषयुक्त ट्वीट केल्याबद्दल सय्यद यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा तपास सुरू करण्याचे आदेश दंडाधिकारी यांनी वांद्रे पोलिसांना दिले होते. त्यानंतर राणावत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यानंत कंगनाने पोलिस स्टेशनच्या चौकशीला अनुपस्थितीत राहत हायकोर्टाचे दरवाजे ठोठावत, वांद्रे पोलीस स्टेशनमधील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. कंगना राणावत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती. त्यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स (Third Summons) बजावण्यात आला होता. तिसरा समन्स हा 'फायनल अल्टीमेटम' असून, कंगना अनुपस्थितीत राहिल्याने तिला अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांना उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मोठा दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी पर्यंत कंगनाला अटक करू नये असे आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे.

उच्च न्यायालयाने ८ जानेवारीपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश कंगना आणि तिच्या बहीणीला दिले होते. त्याचबरोबर, कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडेलवर तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत वादग्रस्त ट्विट करु नये असे निर्देश कोर्टाने दिले होते. तरी आठ जानेवारीला पोलिसांच्या चौकशीला जाताना कंगनाने वादग्रस्त ट्विट आणि व्हिडीओ प्रसारीत केला होता.


आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरोधात तिच्या ट्विटर हँडलवरून ट्विट आणि व्हिडीओ मेसेज प्रसिद्ध करुन कोर्टाला देण्यात आलेल्या आदेशाचा भंग केल्याच्या आरोपाखाली मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.

"हे ट्विट करताना कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केली असून पोलिस स्टेशन भेटी दरम्यान ट्वीट करण्याचा हेतू हा

पोलिसप्रती तिरस्कार आणि खोटी सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न आहे, सय्यद यांनी असेही म्हटले आहे की तिचे ट्विट न्याय आणि न्यायालयीन कार्यवाहीत हस्तक्षेप करतात आणि कोर्टाचा अधिकार अतिक्रमीत करतात. याप्रकरणी आता 25 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

Tags:    

Similar News