राज्यात दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

Update: 2023-11-06 04:35 GMT

महाराष्ट्रसह देशात दिवाळीचा सण हा धुमधडाक्यात साजरी केला जातो. याच पार्श्वभूमिवर मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारपेठा सज्ज झाल्या आहे. दिवाळी सण हा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली तसेच उपनगरातील मुख्य बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनं, कपडे, मिठाई, आकाशकंदील, विद्यूत माळा, पणत्या, रांगोळी या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक मोठया संख्येने गर्दी केल्याचे दिसून आले. यंदा बाजारात पारंपारिक आणि पर्यावरणपूरक असे विविध प्रकारात आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. हे पर्यावरणपूरक कंदिल खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल आहे. तसेच दिवाळी पहाट निमित्त तरुण मुला-मुलींसाठी कपड्यांमध्ये विविध प्रकार आले आहेत. त्यामुळे कपड्यांच्या दुकानातही ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी सुट्टीचा दिवस साधत मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केल्याने दुकानदारात देखील उत्साहाचे वातावरण दिसून आले.

Tags:    

Similar News