प्रजासत्ताक दिन परेड: महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्र सरकारने परवानगी नाकारली

महाराष्ट्राच्या चित्ररथाला मोदी सरकारने परवानगी नाकारली…

Update: 2022-01-17 05:51 GMT

दरवर्षी प्रमाणे यंदा राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचं सादरीकरण होणार नाही. प्रत्येक 26 जानेवारीला (प्रजासत्ताक दिन) देशातील सर्व राज्य आपल्या राज्याची संस्कृती, कला, साहित्य याचा देखावा चित्ररथातून सादर केला जात असतो. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या चित्र रथातून संत परंपरेवर आधारीत महाराष्ट्राच्या वैभवाचं चित्रण करण्यात आले. मात्र, यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी महाराष्ट्रांसह पश्चिम बंगाल, बिहार आणि केरळच्या चित्ररथांना संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे.

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात 'महाराष्ट्रातील जैवविविधता मानके' या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार होता. मात्र, संरक्षण मंत्रालयाने यंदा परवानगी नाकारल्याने या चित्ररथाचे संचालन प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये होणार नाही. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिखट संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.




 



यंदाच्या पश्चिम बंगालच्या चित्ररथात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त चित्ररथ साकारण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याने त्यांनी आपली नाराजी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. ममता यांनी आपल्या पत्रात, केंद्र सरकारच्या या व्यवहारामुळे लोकांना धक्का बसला आहे. देशाला 75 वर्ष पूर्ण होत असतांना देशातील बहादूर स्वातंत्र्य सेनानींच्या योगदानावर आधारित चित्ररथाला जागा न मिळणं संतापजनक आहे. या आशयाचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलं आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने 22 चित्ररथांची निवड केली आहे. यामध्ये विविध विभाग आणि मंत्रालयाच्या ६ चित्ररथांची निवड केली आहे. तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सोळा चित्ररथांचा समावेश आहे.

Tags:    

Similar News