नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Update: 2023-08-04 12:30 GMT

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक, एन.डी. फिल्म स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यू बाबत खालापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद देखील करण्यात आली होती. आज नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी लेखी तक्रार करून Edelwise फायनान्स कंपनीच्या पदाधिकारी यांनी कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला व त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले. त्यावरून खालापूर पोलीस स्थानकात संबंधित पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम करीत आहेत.

Tags:    

Similar News